मुंबईतील वाहतूक आणि रहदारी

• मुंबईच्या वाहतूकोसाठी एक सर्वकश नियोजन आराखडा तयार केलेला आहे. विविध सल्लागार कडून अभ्यास करून असा आराखडा तयार केला. त्यात समाविष्ट केलेले घटक म्हणजे रेल्वे, रस्ते जलवाहतूक, हवाई वाहतूक, वगैरे.

• त्याचा सर्वकश रितीने विचार करण्यासाठी ज्या घटकांचा अंर्तभाव केला आहे त्यात, प्रत्येक निवास स्थानाच्या समुहासाठी शक्‍यतो जावळात जवळ वाहतूकीची व्यवस्था, हे गृहीतक धरले गेले. अशी वाहतूक अर्थातच शक्यतो सरकारी माध्यमातून निर्माण केलेली असावी.

• उपयोगात येणारी व्यवस्था म्हणजे नेहमीची लोकल ट्रेन, मेट्रोच्या मास रॅपीड ट्रन्झीट सीस्टीम (॥॥२1५) बसेसची व्यवस्था वगैरे.

• ह्या वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून गतिशील आणि विना अडथळा वाहतूकीचे नियोजन मुंबई साठी होत आहे.

• मुंबई शहरासाठी जल आणि हवा वाहतूकीचा पर्याय शक्‍य होणार नाही.

• प्रत्येक वाहनाचा आणि फेरयांचा विचार केला तर चारचाको वाहने साधारण, १० टक्के बाईक-टू व्हीलर १५ टक्के रिक्षा तनचाकी ६ टक्के, बस २१ टक्के, रेल्वे (लोकल) ३५ टक्के आणि उरलेले ७ टक्के मेट्रो आणि मोनो असा वापर केला जातो हि टक्केवारी साधारण समजावी.

• एकंदर वाहनांची संख्या साधारण कार १० लाख, टुव्हीलर २ लाख चार हजार टॅक्सी चाळीस हजार तीन चाकी १.२ लाख असा ढाचा मुंबई शहरासाठी आहे.

• विविध कारंणामुळे उपनगरामधील निवासी लोकसंख्या अर्निबंध वाढत आहे त्याचा वाहतूकीवर परिणाम झालेला दिसतो अधिकारी डॉ. पसरिचा यांनी केलेल्या अभ्यासाप्रमाणे आधी दक्षिण मुंबईकडे येणारे वाहतूकीचे प्रमाण जास्त होते. ते प्रमाण आता दक्षिणोत्तर वाहतूकीची समानता निर्माण झालेली दिसते.

• मुंबईच्या रहदारी बद्दलचा (1.००) अभ्यास संर्वकश रितीने करण्यासाठी संगणकोय कक्ष स्थापन केला गेला, त्यांच्याकडून रहदारी नियंत्रणाबद्दलचा सखोल विचार करण्याची अपेक्षा असते. मुंबईतील साधारण १५० वाहतूक बेटांचा विचार करण्याचे अपेक्षीत आहे. हे काम परिपूर्ण रितीने झालेले दिसत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *