News

पर्यावरण/ आंबा कोय / संबंधी विनंती 👇🏻१०००० अंबा रोपे/ हरियाली संकल्प २०२४

नमस्कार मंडळी🙏🏻आंबे खाताय ना भरपूर 😊 मग उरलेल्या कोयी आमच्या हरियाली साठी ,उन्हात एक दिवस पूर्ण सुकवून , प्लास्टिक पिशवीत भरून, आमच्या खालील नर्सरित आणून द्या किंवा खालील पत्त्यावर पोस्ट/कुरिअर ने पाठवा! वोया वर्षी (जुलै २०२४) दहा हजार (१००००) आंब्याची रोपे बनविण्याचा संकल्प हरियाली या आमच्या संस्थेने केला आहे.

या मध्ये तुम्ही दिलेल्या कोयी आम्ही एक फूट उंचीच्या सुक्या पाला पाचोळा च्या ढिगावर पसरून ठेवणार! पहिला पाऊस होऊन १५ दिवसात त्याला कोंब आणि मूळ फुटतील! २ लिटर च्या प्लास्टिक पिशवीत पालापाचोळा,कंपोस्ट आणि मातीचे मिश्रणात ती कोंब आलेली लालसर रोपे लावून ती १ वर्ष पिशवीत वाढवणार. साधारण ७ फूट उंच होईपर्यंत त्याला पाणी देऊन वाढवणार आणि ज्या निसर्गप्रेमी इच्छुकांना आपल्या जागेत लावायची आहेत त्यांना लावण्यास देणार तसेच हरियाली ला मिळालेल्या वनखात्याच्या जमिनीवर त्याची लागवड करायची आहे.रोप ७ फूट वाढलेले असल्यामुळे त्याची जगण्याची आणि वाढण्याची शक्यता ९० टक्क्याहून अधिक राहते असा आमचा २७वर्षाचा अनुभव आहे.

हरियाली ने गेल्या २७ वर्षात आपल्यासारख्या अनेकांच्या लोकसहभागातून अशा प्रकारे १ लाखाहून अधिक रोपे लावून ३ मानवनिर्मित वन तयार करून वनखात्याला दिली आहेत हे इथे नमूद करणे आवश्यक वाटते.!प्रत्येकानी कमीत कमी ५० तरी कोयी द्याव्यात अशी अपेक्षा आहे.!आपल्या व्हॉट्सअँप गृपवरील सर्वांनी तसेच ज्यांना हरियाली च्या उपक्रमात इच्छा असूनही आत्तापर्यंत प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही त्यांनी या संधीचा जरूर लाभ घेऊन पर्यावरण रक्षणाच्या या कामात सहभाग घेउन आपला खारीचा वाटा उचलावा ही विनंती🙏🏻🙏🏻🙏🏻.

नर्सरीचा पत्ता – ( कोई प्रत्यक्ष आणून देण्यासाठी). म्युनिसिपल नर्सरी ,मुरार रोड,कालिदास कॉम्प्लेक्सलगत, मुलुंड पश्चिम. (वेळ ९ ते ४ सोम ते शनी).

पोस्टाने किंवा कुरिअर पत्ता – द्वारका बंगला, पुष्पधन्वा सोसायटी,मदन मोहन मालवीय रोड ,मुलुंड पश्चिम. मुंबई ४०००८०