मुंबई जिल्हयाविषयी काही महत्वाच्या आणि वैशिष्टयपुर्ण गोष्टी
क्षेत्रफळ 0 वर्ग कि.मी.
साक्षरतेचे प्रमाण 2%
एकुण गावं 87
1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 832
मुंबईत मुख्यतः मराठी ही भाषा बोलली जाते त्याखालोखाल कोळी व कोकणी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा बोलणारे देखील आहेत.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे, राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 ( आग्रा-मुंबई), राष्ट्रीय महामार्ग क्र. 4, राष्ट्रीय महामार्ग क्र. 8 हे मुंबईतुन सुरू होतात.
भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे म्हणुन या शहराकडे पाहिले जाते या शहराची अंदाजे लोकसंख्या 3 कोटी 29 लाख ऐवढी आहे.
उपनगरांसह मंबई हे जगात 5 वे सर्वात विशाल शहर आहे.
ज्यावेळेस मुंबईचा विस्तार व्हायचा होता त्यापुर्वीपासुन कोळी लोक या ठिकाणी समुद्र किना.यावर वास्तव्यास आहेत, त्यांचा उदरनिर्वाह हा संपुर्णतः सागरावर अवलंबुन आहे,समुद्रातले मासे पकडायचे आणि ते ताजे असतांनाच विकायचे असा त्यांचा व्यवसाय आज मुंबईत या कोळी लोकांचे अनेक कोळीवाडे अस्तित्वात आहेत. (मांडवी, धारावी, शिवडी, वेसावे, वडाळा, कुलाबा, माहीम, शींव, वरळी, खार, गोराई, चिंबई, मालाड, मढ येथे या कोळयांचे कोळीवाडे आहेत)
आज मुंबई आपल्या देशाची आर्थिक आणि मनोरंजनाची राजधानी म्हणुन सर्वत्र ओळखली जाते.
मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार, रिझर्व बॅंक अश्या आर्थिक आणि महत्वाच्या संस्था या शहरामधे आहे.
महात्मा गांधीजींनी चलेजाव चळवळ 1942 ला मुंबई येथुनच सुरू केली.
प्रत्येक माणसाला भुरळ पाडणारी चित्रनगरी अर्थात चित्रपट सृष्टीची पाळंमुळं या शहरात खोलवर रूजली असुन त्यामुळे या क्षेत्रात काम करणा.या कलाकारांना पाहण्याकरता देखील येथे लोक मोठया प्रमाणात मुंबईल येत असतात.
ही सिनेसृष्टी बॉलीवुड या नावाने जास्त प्रचलीत आहे.
चित्रीकरणाकरता महत्वाचे असे मोठमोठे स्टुडीओ या शहरात असुन चित्रपटांचे, मालिकांचे या ठिकाणी रोज चित्रीकरण होत असते.
मुंबईचे हृद्य समजली जाणारी येथील लोकल देखील या शहराचा अविभाज्य भाग आहे लाखो चाकरमानी रोज या लोकल मधुन ये.जा करत असतात.
बांद्रा वरळी सी लिंक हा मुंबई येथील एक महत्वाचा रस्ता असुन संपुर्णतः समुद्रावर बांधलेला हा रस्ता आहे. 5 वर्ष कालावधी आणि 660 कोटी अंदाजे खर्च अपेक्षीत असतांना अनेक अडचणी आणि अडथळे पार करत हा रस्ता बांधणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे काम होते. हा रस्ता बांधण्याकरता 10 वर्ष आणि 1600 कोटी खर्च आला. आता हा रस्ता वाहतुकीकरता उपलब्ध करून देण्यात आला असुन या मार्गावरून ये जा करणा.यांचा बराच वेळ या रस्त्यामुळे आता वाचतो.
जलमार्गाने वा वायुमार्गाने येणारे युरोप, अमेरिका, अफ्रीका अश्या पश्चिमी देशातले नागरिक आधी मुंबईला येतात आणि त्यामुळे या शहराला भारताचे प्रवेशव्दार देखील म्हंटले जाते.
छत्रपती शिवाजी टर्मिनस (रेल्वे स्थानक), E.S.T. (बस सेवा), छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानसेवा, या नावाने ओळखल्या जातात
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वात व्यस्त विमानतळ म्हणुन ओळखलं जातं.
युनेस्को या वैश्विक संस्थेने मुंबई येथील दोन स्थळांना आपल्या यादित मानाचे स्थान दिले आहे 1) छत्रपती शिवाजी टर्मिनस 2) एलिफंटा येथील गुफा
मुंबई नाटकांकरता देखील फार प्रसिध्द आहे. पुणे आणि मुंबई येथे सर्वाधीक मराठी नाटकं तयार होतात आणि सादर देखील होतात. येथे अनेक प्रसिध्द नाटयागृह देखील आहेत
सर्वधर्माचे सण या मुंबईत मोठया आनंदात आणि उत्साहात साजरे होतांना दिसतात. येथील गणेशोत्सवात गणेशाच्या उंचच उंच मुर्ती जगाचे लक्ष आपल्याकडे वेधतात, त्याचप्रमाणे या शहरात साजरा होणारा दहीहंडी उत्सव तर जगभरात प्रसिध्द आहे तो त्या उंचच उंच मानवी मनो.यांमुळे.
प्रत्येक पावसाळयात सरासरी वर्षाला 2000 मि.मी. एवढा पाउस मुंबईला पडतो.
मुंबईला 26 जुलै 2005 साली एकाच दिवसात 944 मि.मी. एवढा विक्रमी पाउस पडला त्यामुळे संपुर्ण मुंबई त्या दिवशी जलमय झाली होती, अनेकांना जीव गमवावा लागला ज्या लोकांनी तो दिवस अनुभवला ते आज देखील त्या दिवसाच्या आठवणीने हादरून जातात.
वाढत्या नागरिकरणाचा ताण मुंबईला कायम सहन करावा लागतो आहे त्यामुळे उद्भवणाया समस्या देखील आहेत, धारावी ही झोपडपट्टी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणुन प्रचलीत आहे.