- २०११ चा जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या साधारण १३७ लाख एव्हढी धरली जाते.
हि लोकसंख्या २००१ साली १२० लाख होती १९९१ ला साधारण १०० लक्ष होती
याचा अर्थ २० वर्षात साधारण ३७ लाखांनी वाढली. हया गणिता प्रमाणे २०३१ साली
१५० लाख अनुमानित होवू शकते. असे पण सांगीतले जाते ही लोकसंख्या वाढीचे प्रमाण
कमी होत २०६० साला पर्यंत ती सिमीत होण्याची शक्यता आहे.
- संपूर्ण क्षेत्रफळाच्या साधारण ६५ टक्के भुभाग विकसीत स्वरुपात आहे. त्यातील साधारण
४० टक्के राहण्याची व इतर संकुले, साधारण ४ टक्के व्यापार व कचे-या, साधारण ९
टक्के उद्योग, ७ टक्के बंदरे, वाहतूक आणि तत्सम सेवा आणि उर्वरीत १३ टक्के इतर
सुविधांसाठी .