मलनि:सारण

• मुंबईच्या मलनि:सारण अभियानाला १८८० साली सुरूवात झाली ज्यावेळेस वरळीला विटांच्या बांधकामाचे काही प्रकल्प राबविले गेले. मलनि:सारण प्रकल्पा साठी साधारणत: कमी तरतूद केली जाते. त्याचे कारण महणजे अर्थातच शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पांवर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रीत केले जाते.

• तरी सुध्दा मुंबई महानगरपालिकेने दादर, लोवग्रव्ह (वरळी) धारावी आणि कुलाबा येथे प्रक्रीया केन्द्रे सुरु केली. पण १९५० आणि १९५७ हया दोन वर्षात महापालीकेत उपनगरे आणि विस्तारीत उपनगरे समाविष्ठ केली. त्यामुळे मलनि:सारण योजना आणख मागे पडल्या.

• परिस्थिती सुधारण्यासाठी १९६२ मध्ये एक उच्च स्तरिय समिती स्थापन केली आर्थिक तरतूदीच्या अभावी समितीने सुचित केलेली कामे फारच कमी प्रमाणात झाली. सन १९७० ते २००५ पर्यंत विविध सल्लागार नेमून मलनि:सारण प्रकल्पांची एकात्मीक योजना तयार झाली. जागतिक नाणेनिधी मदतीमुळे चांगल्या गोष्टी घडून आल्या सन २००५ पासून पुढे आणखी सल्लागारांची नेमणूक करून केन्द्र आणि राज्यसरकारच्या नियमांप्रमाणे कामांची तरतूद केली जात आहे. तरी पण सन २००५ पूणत्वास झालेल्या योजने मुळे मुंबई शहरासाठी चांगल्या प्रकारे पाया व्यवस्था निर्माण केली त्याच लक्ष सध्या शहराला मिळत आहे.

• हया एकात्मीक प्रकल्पा मध्ये शहजराचे सात विभाग निर्माण केले गेले उदा. कुलबा, वरळी, बांद्रा, वर्सोवा, मालाड, घाटकोपर आणि भांडूप, तीन आटफॉलच्या आणि चार लगून द्वारे योजना पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न महापालिकेने केले. जबाबदारी मुंबई महानगरपालीकडून चांगल्या प्रकारे सांभाळता येत नाही असे दिसते.

• जनतेचा सहभाग कच-याचे, वर्गीकरन विक्रेद्रीत प्रक्रीया केंद्र किती प्रमाणात केली हया वर स्वच्छतेचे यश अवंळबून असते विविध प्रकारचे निबंध आणून मुंबई महापालिका असे यश मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण फारच मर्यादित स्वरूपात असे घडतना दिसतो. निवडून आलेले लेकप्रतिनीधी आणि त्यांचा सहभाग अपेक्षीत असून तरीही हि जाणीव चांगल्या प्रकारे त्यांच्यात झालेली दिसत नाही.

• मुंबईची लेकसंख्या, घनता वगैरेचा आवाका इतर कोणत्याही शहरापेक्षा जास्तर असल्यामुळे आणि घनकचरा विभागाला जनतेकडून सहभाग मिळाल्या शिवाय स्वच्छ मुंबई हे विरूध लावने शक्‍य नाही.

• साधारण १६०० कि.मि. चे सांडपाणी वाहून नेणारे नळ आणि वरील सात ठिकाणची प्रक्रीया केन्द्र अशा एकात्मीक प्रकल्पांचे स्वरुप आहे.

• एव्हढया मोठ्या प्रमाणात झालेली कामे आणि नळ योजना चांगल्या रितीने कार्यान्वीत राहावी म्हणून खास विभाग निर्माण करण्यात आला ज्याचा आवाकापण मोठा आहे. (सांडपाणी देखभाल विभाग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *