- मुंबईच्या आरोग्याची सर्व जबाबदारी आणि सर्व नागरीकांना चांगले आरोग्य देणे ही
व्यवस्था कायद्या प्रमाणे महापालिकेत अर्निवाय आहे. त्यामधे साथीचे आणि इतर आजार
नागरीकांना होवू नये, यासाठी सर्व प्रतिबंधत्माक उपाय मुंबई महापालिकेने करावे अशी
अपेक्षा आहे. नागरी गरीब वस्त्था (झोपडपट्टी) मोठ्या प्रमाणावर दाटीवाटीने मुंबई शहरात
असणे हा एक महात्वाचा पैलू आरोग्य सुविधा देण्यासाठी आहे.
- हे किती चांगल्या प्रकारे मुंबई महापालिका अंमलात आनू शकते हयाचे तीन निकष म्हणजे
जन्मदर, मृत्यूदर, बालमृत्यूदर या तिनही निकषामध्ये महापालिकेने चांगल्या प्रकारे काम
केल्याचे जागतीक आरोग्य संघटना हया संस्थेने नोंद केली आहे.
- चोथा निकष म्हणजे मुंबईतील स्वच्छता एंकदरीतच जनतेचा बेशिस्त आणि खानपान सेवा
पुरवणाच्या जागा मधील अस्वच्छता, निगा राखन्या मध्ये अपयश या सर्व कारणामुळे
अपेक्षीत असलेली स्वच्छता मुंबई शहारामध्ये नाही.
- विशीष्ठ रोग पसरून जनतेत त्रास होवू नये हि अपेक्षा मुंबई महापालिकेने ब-यापैकी
अंमलात आणलेली दिसणे उदा. मलेरियाच्या पॉझीटीव केसेस अत्यंत कमी येणे, टी.बी. चे
निर्मुलन, ॥॥४ चे निर्मुलन वगैरे. त्याशिवाय कॅन्सर, हुद्ययोग आणि इतर रोगांचे प्रमाण
कमी आणणे हयात सुध्दा महापालिकेने ब-यापैकी काम केलेले दिसते.
- सर्व सकारात्मकता मिळाविण्या करिता महापालिकेत पायाभुत सुविधांची चांगल्याप्रकारे
सोय व आखणी करावी लागली. महाविद्यालयाशी सलग असलेली चार मोठी रुग्णालये
सल्लग्नता असलेली साधारण २० लहान रुग्णालये मोठया प्रमाणावर दवाखाने, आरोग्य
केन्द्रे, प्रसुतीगृह, ट्रॉमाकेन्द्र वगैरे सेवा निर्माण कराव्या लागल्या.
- सरकारी आणि खाजगी माध्यमातून उपलब्ध असलेली – ४० हजार बेड, मुंबई
शहारासाठी आहेत. एक हजार नागरीकांमागे तीन बेडची उपलब्धता अशा सर्व निकषांमध्ये
मुंबई महानगरपालिकेने चांगले यश मिळविलेले दिसले. जागतिक निकषा प्रमाणे
कोणत्याही शहरात ९ हजार नागरीका मागे चार बेड योग्य समजले जाते.