स्वागतकक्ष

ज्ञानदीप मुंबई विभाग आयोजित रोबोटिक कार्यशाळा

दिनांक १५ मे २०२४ रोजी ज्ञानदीपच्या मुंबई विभागात विविध शाळातील शिक्षक व नागरिक यांचेसाठी रोबोटिक कार्यशाळा घेण्यात आली. पुणे येथील इन्स्कल्प्ट टेक्नॉलॉजीचे सत्यजित जगताप आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांच्या रोबोटिक किट्सविषयी प्रात्यक्षिक सादर केले.

सकाळी ११ वाजता मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री. सुरेश पाटणकर यांनी पुण्याहून आलेल्या चमूचा परिचय करून प्रास्तविक केले.नंतर सत्यजित जगताप यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून रोबोटिक व STEM चा परिचय व माहिती दिली. तसेच मार्केटिंग हेड ऋतुजा जाधव यांनी उपयुक्तताव शाळांसाठी रोबोटिक किटचा कसा फायदा होईल. तसेच अॅडमिशनला व मुलांना शिक्षणात याचा कसा उपयोग होईल याची विस्तृत माहिती दिली.

वेगवेगळ्या रोबोटचे प्रात्यक्षिक व माहिती कार्क्रमास उपस्थित असणा-या शाळांतील शिक्षक शिक्षिकांना दिली. त्यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास शाळांचे प्रतिनिधी व काही कन्सल्टंट्स उपस्थित होते. कार्यक्रम गुणवत्तापूर्वक झाला. बिझिनेस लंचनंतर दुपारी ३ वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यवाह श्री शिवशंकर हिंगणे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

हा कार्यक्रम घेऊन ज्ञानदीपच्या मुंबई विभागाने रोबोटिक किट प्रशिक्षणाच्या प्रसारात आघाडी घेतली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या विभागामार्फत आता ऑफलाईन (प्रत्यक्ष) कोर्सेस सुरू करण्यात येणार असून रोबोटिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.

अदिक माहितीसाठी मुंबई विभागाच्या मायमुंबई डॉट नेट या वेबसाईटला भेट द्या.तसेच तेथे आपल्या जाहिराती देङन आर्थिक सहकार्य करावे ही विनंती.

ज्ञानदीपतर्फे खेळातून विज्ञानासाठी प्रा. भालबा केळकर आणि रोबोटिक किटसाठी सत्यजित जगताप यांच्या नेतृत्वाखाली अशा कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. शैक्षणिक संस्थांनी यासाठी संपर्क साधावा ही विनंती, धन्यवाद.

  • डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली संपर्क – drsvranade@gmail.com/ +91 88305 96882 / +01 (408) 338 7672

—————————————————————————————————-

ज्ञानदीपच्या मुंबई शाखेतर्फे ७ एप्रिल २०२४ रोजी संपन्न झालेले चर्चासत्र –

मुंबई पर्यावरण व संतुलित विकास

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. वेबसाईट व मोबाईल अॅपसाठी मराठी भाषेचा आवर्जून उपयोग करणा-या ज्ञानदीप फौंडेशनचे मुंबईत शाखा सुरू करण्याचे स्वप्न मुंबईचे निवृत्त मुख्य अभियंता श्री. सु. ना. पाटणकर यानी पूर्ण केले आहे. त्यांच्या मुलुंड येथील निवासस्थानी ज्ञानदीप फौंडेशनची मुंबई शाखा १५ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू झाली.

मुंबई चे पर्यावरण, विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्याची स्थानिक जनतेला माहिती व्हावी या उद्देशाने ज्ञानदीपने माय मुंबई डॉट नेट ( https://mymumbai.net )या नावाची वेबसाईट सुरू केली आहे. त्याचे औपचारिक उदघाटन ७ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आले.

सकाळचे सत्र पर्यावरण तंत्रज्ञान व विकास या साठी तर दुपारचे सत्र मायमुंबई वेबसाईटच्या माध्यमातून जनजागृती व प्रशिक्षण यासाठी नियोजित केले होते. मुंबई शाखेच्या पुढील प्रगतीसाठी हे चर्चासत्र मार्गदर्शक ठरणार आहे.

चर्चासत्रात मान्यवरांनी केलेले सादरीकरण आणि इतर माहिती संपादित करण्यात येत असून इ-बुकच्या स्वरुपात ती या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

ज्ञानदीपच्या मुंबई विभागातर्फे वेबसाईट डिझाईन, सॉफ्टवेअर, व प्रशिक्षण याविषयी माहिती घेण्यासाठी खालील ठिकाणी संपर्क करावा.


संपर्क – ज्ञानदीप मुंबई शाखा
द्वारका, पुष्पधन्वा सोसायटी, पं. मालवीय रोड, मुलुंड ( पश्चिम)
मुंबई – 022-2567 9245
भ्रमणध्वनी – 9322272777

  • डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
    इ मेल – info@dnyandeep.net / +818422310520

मुंबई-पर्यावरण व विकास या चर्चासत्रातील क्षणचित्रे